बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना नुकताच प्रतिष्ठित ’चंपावतीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय जनतेला देत, जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासावर भाष्य केले.
रविवार दि.22 रोजी हॉटेल नीलकमल येथे रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीनेमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ’चंपावतीरत्न’ पुरस्कार रो.सुधीर लातुरे, मयंक गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रा.ओम मोतिपवळे, रो.हरीष मोटवाणी, ह.भ.प.विनय महाराज पाटांगणकर, सुभाषचंद्र सारडा, नितीनचंद्र कोटेचा, समीर काझी, अजित वरपे, दिलीप खिस्ती, सुनिल क्षीरसागर, महेश वाघमारे, अॅड.कालिदास थिगळे, सत्यनारायण लाहोटी, विलास बडगे, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, प्रा.जगदिश काळे, अरूण डाके,नानासाहेब काकडे,अरुण बोगाने रो.विकास उमापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराला उत्तर देताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, वादापेक्षा विकासावर विश्वास ठेवणार्या जनतेने मला जी साथ दिली, त्यामुळेच हे शक्य झाले. हा पुरस्कार मी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला समर्पित करतो. 50 वर्षांपूर्वीचा जिल्हा आणि आजचा जिल्हा यातला फरक सर्वांच्या समोर आहे. आम्ही सर्वच काही केले असा आमचा दावा नाही, मात्र जे-जे शक्य होते ते करून दाखवले. असे सांगून त्यांनी पाणी प्रश्नावर विशेष भर दिला. ते म्हणाले, मराठवाड्याच्या हक्काचे 28 टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, हीच आमची मुख्य इच्छा आहे. बीड जिल्ह्यातील मजुरांच्या हाताचा कोयता कायमचा बंद होऊन आपली जमीन पाणीदार व्हावी, हेच आमचे स्वप्न आहे. पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विकासासाठी जात, धर्म आणि पंथ बाजूला सारून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अजूनही अनेक कामे होणे बाकी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमच्या प्रेमाची जी शिदोरी माझ्याकडे आहे, त्या जोरावर मी या जबाबदार्या समर्थपणे पेलण्यास तयार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांवरही टीका केली. काही लोक केवळ वरवरचे मुखवटे धारण करून भ्रम निर्माण करत आहेत, मात्र जनतेने चांगल्या-वाईटाची पारख केली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. याशिवाय रो.हरीष मोटवानी, रो.मोतिपवळे, रो.मयंक गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाबुशेठ लोढा, सुधाकर मिसाळ, भास्कर जाधव, सखाराम मस्के, अशोक शेटे, प्रकाश कानगांवकर, अर्जुन बहिरवाळ, राणा चौव्हान, विजय सरवदे, सुर्यकांत महाजन, विशाल क्षीरसागर, प्रमोद करमाळकर, विष्णुदास बियाणी, रामेश्वर कासट, अमोल लहाने, डॉ.महेंद्र गौशाल, डॉ.अरूण भस्मे, किशोर पगारिया, लक्ष्मीकांत सोनी, सुरेंद्र कासट, मनमोहन कलंत्री, जवाहर कांकरिया, राहूल बोरा, रो.सुमित जयस्वाल, रो.सुरेश लड्डा, रो.वाय जनार्दनराव, रो.संतोष पवार, रो.मुकुंद कदम, रो.मेघराज पिंगळे, सुहास बेदरे, गणेश मुळे, संदिप खोड, ओमप्रकाश लोहिया, राम मोटवानी, सुरज लाहोटी, विवेक बडगे, प्रमोद धारवाडकर, कल्याण कुलकर्णी, सुनिल खंडागळे, अशोक राऊत यांच्यासह महिला, पुरूषांची उपस्थिती होती,
माजी खा.स्व.काकूंना मिळाला होता चंपावतीरत्न पुरस्कार
जिल्ह्याच्या माजी खासदार स्व.केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू यांना सन 2002-03 मध्ये रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने चंपावतीरत्न पुरस्कार मिळाला होता आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पण सन 2025-26 मध्ये चंपावतीरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

