अजितदादांचा विमान अपघात,खा.सोनवणे यांना वेगळीच शंका

बीड — ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान  अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर विमान अपघातावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, आता खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील नवी शंका उपस्थित केली आहे.

विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे अशी शंका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणेंनी उपस्थित केली आहे. त्यांच्या या शंके नंतर आता नवीन विषयाला तोंड फुटलं आहे.

यावेळी सोनवणे यांनी आणखीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानात 6 लोक होते तर 5 बॉड्या कशा सापडल्या? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार घरून निघतानाचे सीसीटीव्ही फुटेज आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासलं पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर सोनवणे यांनी आपल्या आयुष्यात दादा किती महत्वाचे होते यावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला घडवण्यामध्ये अजितदादा पवार यांचा मोठा वाटा आहे. 1999 पासून त्यांचा माझा संबंध आला. अजित दादा माझे राजकीय वडील होते. आज संपूर्ण महाराष्ट दुःखात आहे.

हा सर्व नियतीचा खेळ आहे. येडेश्वरी कारखाना परिसरात अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार आहोत. या स्मारकामधून सर्वांना ऊर्जा मिळेल. बीड जिल्ह्यात नसेल, असं स्मारक उभारणार आहोत. एका वर्षात स्मारक बांधून पहिल्या पुण्यतिथीला लोकार्पण करणार आहोत. बीड जिल्ह्याच्या विकासाची वेळ आली आणि दादा गेले हे दुर्दैव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी भाष्य करणार नाही, कारण आज ती वेळ नाही असंही ते म्हणाले.

दादा मला हेलिकॉप्टरमध्ये काय बोलले हे मी आज सांगणार नाही. पण दादा जे काय बोलले ते अपूर्ण राहू नये, असं आम्ही काम करणार आहोत. आज राजकारणावर बोलण्याची वेळ नाही. दहा दिवस दुखवटा असल्याने मी माध्यमांशी बोललो नाही. दादांचा आम्हाला मोरल सपोर्ट होता. आता बीड जिल्ह्याचा विकास होईल की नाही? हे सांगता येत नाही.राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बैठकीला मी नव्हतो. बीडहून संभाजीनगर आणि तिथून आम्ही सोबत प्लेनने पुण्याला गेलो होतो. ज्या माणसावर आम्ही परमेश्वरापेक्षा जास्त प्रेम केले तो आता निघून गेला असंही ते म्हणाले.

दादा गेले त्या विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेत. विमानात 6 लोक होते, मग 5 बॉडी कशा सापडल्या? ज्या प्रकारे अपघात झाला, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया यांच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा तपास सार्वजनिक करा. पायलट कोण होता याची चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे  सिसीटिव्ही फूटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. वर विमान ब्लास्ट का झाले? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles