बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल
बीड — शांतीचा संदेश देत “जिवो जीवस्य जीवनम्” म्हणजेच मानवी जीवनात समानता, सहाय्य आणि परस्पर आदराचे महत्त्व शिकवत सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या जैन धर्मगुरू समोरच भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी गुंडगिरी करत एकाला मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न.प.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप शहराध्यक्षांने धार्मिक कार्यक्रमात घातलेल्या धुडगुसामूळे चर्चेला उधाण आले आहे.
सत्ता, पद, पैसा आला की माणूस किती मस्तवाल होतो. याची प्रचिती आज आली गेली.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या जैन धर्मगुरूंचा प्रवचन कार्यक्रम बीड शहरात सध्या सुरू आहे. मंगळवार दि 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फुलाई नगर भागात जैन मुनिं च्या प्रवचन कार्यक्रमास जवळपास 50 ते 60 लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम मंगलमय वातावरणात शांततेत सुरू होता. एका संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या कामासंदर्भात चर्चा सुरू झाली.या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा देखील उपस्थित होते.यावेळी अशोक लोढा यांचा कुठलाही संबंध नसताना तुम्ही फार मोठे लागून गेला का? तुम्ही लोकांना मदत काय करता? यासारखे प्रश्न उपस्थित करून अरेरावी ची भाषा वापरण्यास सुरुवात केली. यावेळी जितेंद्र सुखराज बोरा वय 50 वर्ष व्यवसाय व्यापारी रा. सारडा रेसिडेन्सी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. धार्मिक कार्यक्रमात असा मारहाणी सारखा प्रकार नको कार्यक्रम शांततेत व्हावा यासाठी म्हणून जितेंद्र बोरा यांचे मोठे बंधू पारस बोरा हे देखील हस्तक्षेप केला. पारस बोरा यांना देखील ढकलून देत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी जितेंद्र बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अशोक लोढा विरोधात बीएनएस कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भारती करत आहेत.दरम्यान भाजप सारख्या संस्कारक्षम पक्षाच्या शहराध्यक्षांनीच धार्मिक कार्यक्रमात असा धुडगूस घातला या बातमीनेच सर्वत्र खळबळ माजली आहे.ऐनन.प निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

