Sunday, December 14, 2025

पत्नी पीडितांकडून कावळा पूजनाने पिंपळ पौर्णिमा साजरी!

छ‌.संभाजीनगर — वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर येथे पत्नी पीडित पुरुषांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने पिंपळपोर्णिमा साजरी केली. सात जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी करतात.मात्र त्रास देणारी पत्नी नकोच असं म्हणत कावळा पूजन देखील केलं.


सुवासिनी महिला पतीला दीर्घायुष्य मिळाव तसेच हाच पती सात जन्म भेटावा यासाठी वडाची पूजा दरवर्षी करतात.मात्र पत्नीपीडित पुरुषांची संख्या वाढली आहे.कायदेही महिलांच्या बाजूंनी आहेत.पत्नींकडून होणाऱ्या त्रासामुळे पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाच्या झाडाभोवती फेऱ्या मारल्या आणि कावळ्याची पूजा केली. वैवाहिक जीवनातील त्रासातून सुटका मिळावी, ही त्यांची या मागची प्रतीकात्मक मागणी होती.पुरुषांनी पत्नींकडून होणारा त्रास आणि पतींना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत असलेल्या पुरुषांसाठी जागरूकता आणि समर्थनाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महिलांकडून होणारे अत्याचार आणि त्रास पुरुष कुठेही व्यक्त करू शकत नाहीत, आणि अशा घटना वाढत असल्याचा दावा पत्नीपीडित पुरुषांनी केला आहे. दरम्यान, कावळ्याचे पूजन करत, “त्रास देणारी बायको सात जन्म तर काय, सात सेकंदही नको!” अशी अजब प्रार्थना करून बायकोच्या त्रासाला विरोध करत या आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली व्यथा मांडली. या ‘कावळा पूजन’ कार्यक्रमाने वैवाहिक संबंधांमध्ये पुरुषांना येणाऱ्या आव्हानांवर आणि समस्यांना सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याच्या गरजेवर चर्चा सुरू झाली आहे..ज्या पद्धतीने महिलांसाठी चळवळी झाल्या, तशाच पुरुषांसाठी सुद्धा गरज आहे. पुरुषांचा आवाज दबवण्याऐवजी त्यांना ऐकून घेणे, कायद्यात बदल घडवणे आणि सामाजिक मानसिकता सुधारणे यासाठी हे एक पाऊल ठरेल. “देव तरी आमचे म्हणणे ऐकेल,” या भावनेने पिंपळ वृक्षासमोर साकडे घालून पुरुषांच्या अश्रूंना आवाज देण्यात आला आहे अस अध्यक्ष अ‍ॅड. भारत फुलारे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles