Home Uncategorized बीडकरांची स्वप्नपूर्ती: विघनवाडी बीड रेल्वे मार्गाची होणार चाचणी

बीडकरांची स्वप्नपूर्ती: विघनवाडी बीड रेल्वे मार्गाची होणार चाचणी

0
7

बीड — अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू असून बीड करांची स्वप्नपूर्ती होणार आहे. विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 4/5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही याची माहिती दिलेली आहे.

बीडकरांच्या दोन-तीन पिढ्यांनी बघितलेले रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसत आहे. मध्यंतरी रेल्वेच्या‌ रखडलेल्या कामाने गती घेतली आहे. 5 जानेवारी 2024 रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर विघनवाडी ते राजुरी या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी 30 ते 31 डिसेंबरदरम्यान घेण्यात आली. दरम्यान आता पुढील चाचणीचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. आता मंगळवारी पुढील टप्पा पार पडत आहे. 4 फेब्रुवारी रोजी विघनवाडी ते राजुरी आणि 5 फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडून बीड करांची स्वप्नपूर्ती बुधवारी होणार आहे.त्यामुळे चाचणीलगत येणाऱ्या गावकऱ्यांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे. तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी समन्वय यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here