देशमुख हत्याकांड: अन्यायाच्या विरोधात जनक्षोभ!
बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी शनिवारी बीडच्या रस्त्यावर जनता उतरली होती. यामध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे फलक हातात घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या बीड मधील सर्व पक्षीय मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना अद्याप पकडण्यात अपयश येत आहे.या अन्याया विरोधात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने आज मोठ्या संख्येने जिल्हाभरातून जनता मोर्चात सहभागी झाली जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या मुक मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये देशमुख कुटुंब, मनोज जरांगे, संभाजीराजे, नरेंद्र पाटील ,आ. जितेंद्र आव्हाड,खा. बजरंग सोनवणे, आ. सुरेश धस, आ. संदीप क्षीरसागर, आ. प्रकाश सोळंके, आ. अभिमन्यू पवार,ज्योती मेटे, संगीता ठोंबरे, राजेसाहेब देशमुख, राहुल सोनवणे, अनिल जगताप, परमेश्वर सातपुते,दीपक केदार, रणवीर पंडित, महेबुब शेख,रमेश पोकळे, रमेश आडसकर, मोहन जगताप, माजी आ. सय्यद सलीम, राजेंद्र मस्के, सक्षणा सलगर, आदींचा सहभाग होता.शनिवारी सकाळी 9 वाजल्या पासूनच जिल्हाभरातून नागरीक मोर्चात सहभागी होण्यासाठी यायला सुरुवात झाली होती. दुपारी साडेबारा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीक शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जमा झाला.साधारणत: दुपारी 1वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मुक मोर्चाला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक मोर्चा दाखल झाला. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा पावणे दोन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पोहोचला.हातात काळे झेंडे घेऊन फडकवत बीड जिल्ह्यातील अन्यायाच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात महिलांची मोठा सहभाग असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अत्यंत शांततेत हा मोर्चा निघाला होता.
तरुणांची अन्यायाच्या विरोधात घोषणाबाजी
मोर्चा दरम्यान जिल्हाभरातून दाखल झालेल्या तरुणांनी अन्यायाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अमर रहे…. अमर रहे…. संतोष देशमुख अमर रहे च्या घोषणांनी संपूर्ण बीड शहर दणाणून गेले होते.
मूंडे बंधू भगीनीच्या राजीनाम्याची केली मागणी
धनंजय मुंडे अन पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या…. अशी मागणी देखील मोर्चा दरम्यान काही बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली.सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खूण करणाऱ्या त्या आरोपीना फाशीची सजा द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली. यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकाच्या हातात विविध मागण्यांचे फलक पाहायला मिळाले. यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय पाहिजे, संतोष देशमुख आमचं कुटुंब, वाल्मीक कराड ला अटक करा,
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याना फाशी द्या…. यासह विविध मागण्यांचे फलक मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात पाहायला मिळाले.
बीड जिल्हा… बीड जिल्हा…. मोडीत काढा, दहशतीचा बालेकिल्ला !
मागील काहीं दिवसात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. दिवसाढवळ्या खूण, मारामाऱ्या, किडन्यापिग, बलात्कार अशा घटना घडत आहेत. बीडमध्ये होत असलेल्या या अन्याया विरोधात बीडची जनता आता रस्त्यावर उतरली आहे. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकान मध्ये आक्रोश व संताप पाहायला मिळाला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे
संतोष देशमुख प्रकरणातील फरार असलेले आरोपी तात्काळ अटक करा, शिवाय खडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तात्काळ अटक करा, तसेच धनंजय मुंडे याचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या… अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
मूलीची न्यायाची मागणी
माझ्या वडिलांना अत्यंत क्रूरपणे मारले आहे…. माझ्या कुटूंबाला न्याय द्या…. जे माझ्या कुटूंबासोबत घडले आहे ते इतरां बरोबर घडू नये…. त्यासाठी मला न्याय द्या…. अशी भावना स्व. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी संतोष देशमुख हिने केली आहे.
बोगस मतावरचे धनंजय मुंडे आमदार झाले–आ.धस
दोनशेहून अधिक बूथ ताब्यात घेत बोगस मतदान केले. मतदानाच्या आदल्या दिवशीच काहीं मतदाराच्या हाताला शाई लावली. लोकांना मतदान करू दिले नाहीं… बोगस मतावर धनंजय मुंडे आमदार झाले आहेत. असा आरोप आ. सुरेश धस यांनी केला.
आरोपीचा आश्रयदाता मुंडे- छत्रपती संभाजी महाराज
बीडमध्ये हे चाललय तरी काय? आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. माझी मागणी आहे की धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊ नये…. जर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद दिले तर मीच बिड चे पालकत्व घेणार…. यापुढे असे हे घाणेरडे प्रकार खपाऊन घेणार नाहीं…. अत्यंत क्रूर पणे संतोष देशमुख यांना मारले आहे… आता हे आम्ही सहन करणार नाही…. आता आम्हाला यां प्रकरणात आरोपी तात्काळ अटक करुन त्यांना कडक करवाई करा..