Monday, February 3, 2025

हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फड वर गुन्हा दाखल

बीड — हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याच्यावर आर्म्स एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाज माध्यमातून या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये आहेत.लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बीडचा बिहार होत असल्याची चर्चा देखील विधानसभेत केली गेली. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराड व मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोहीम सध्या उघडली आहे.मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेल्या कैलास फड याचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी शेअर केला होता. शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता, हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून व्हायरल होत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीडमधील दहशत, बीडमधील गुंडागर्दी आणि बीडमधील बंदुकधारी तरुणाईचा प्रश्न जटील बनल्याचं यामुळे समोर आलं आहे. याच आधारावर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना विधानसभा निवडणुक मतदानादरम्यान याच कैलास फड याने मारहाण केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles