Wednesday, November 20, 2024

विरोधकांच्या कामाची पाहिलीय मिळमिळ; नमिता मुंदडांच्या कामाला घालायचीय खिळ!

बीड — केज विधानसभा मतदारसंघ नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करत असताना निवडणुकीतील विरोधकांना विकासाला खिळ घालायची असल्याचं जनतेतून सांगितलं जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. 2012 मध्ये त्यांची कर्तबगारी जनतेने अनुभवली आहे. त्यामुळे यापूर्वी अनुभवलेल्या उमेदवारावर डाव खेळून तो आंगलट आणण्याच्या मानसिकतेत केजकर नसल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळत आहे. लोकनेत्या  स्व. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून निघावी यासाठी 2012 मध्ये पृथ्वीराज साठे यांच्याकडे मतदार संघाची धुरा जनतेने सोपवली. मात्र त्यांना नेतृत्व देऊनही आपल्या कामाची चुनुक दाखवता आली नाही. शेवटी स्व.विमल मुंदडा यांनी लोकविकासाचा चालवलेल्या रथाची चाकं जागच्या जागीच रुतली गेली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत साठेंना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देखील माजी लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेशी कधी नाळ जोडून ठेवली नाही. त्यांना तशी गरज वाटली नाही. जनतेच्या प्रश्नासाठी ते कधी रस्त्यावर उतरले नाहीत. कामातला मिळमिळीतपणा जनतेच्या अंगलट आला.शेवटी विकास रथाची चाक कायम रुतली गेलेलीच राहिली. त्याला गती मिळालीच नाही. अखेर केजच्या मतदारांनी स्व.विमल मुंदडा यांचा वारसा त्यांच्या सुनेकडे म्हणजेच नमिता मुंदडा यांच्याकडे 2019 साली पुन्हा सोपवला. जनतेच्या अपेक्षेला नमिता मुंदडा देखील बांधिलकी म्हणून खऱ्या उतरू लागल्या.लोकहिताची काम करताना त्यांनी जात धर्म पंथ यांना तसूभर देखील थारा दिला नाही. त्यामुळे मतदार संघामध्ये सांघिक भावना निर्माण होऊन विकासाला गती मिळणं सोपं गेलं. विकास निधी खेचून आणताना जनतेचे प्रश्न सोडवताना नमिता मुंदडा यांनी सभागृह अक्षरशः डोक्यावर घेतलं. सातत्याने जन विकासाची तळमळ ठेवून पाठपुरावा केल्यामुळे वेळप्रसंगी सत्तेतील आपल्याच माणसाशी भांडून जेवढा निधी खेचून आणता येईल तेवढा निधी खेचून आणला. नुसता तो खेचून आणलाच नाही तर विकास करूनही दाखवला. विकासाची गंगा वाहती ठेवताना धार्मिक श्रद्धास्थाने असलेल्या मंदिरांचा कायापालट करण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला. साठेंच्या काळात झालेली साठमारी त्यांनी मोडीत काढून नव्या अशा जनतेमध्ये निर्माण केल्या. त्यामुळे केज मतदार संघात तरी नमिता मुंदडा यांच्यासाठी 2024 ची विधानसभा निवडणूक एकतर्फी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. निवडणुकीत विरोधका असलेल्या साठेंच्या कामाचा यापूर्वीच मिळमिळीतपणा  जनतेने पाहिला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत तरी सव्वा लाखांनी विजय त्यांच्या पदरात पडला होता. यावेळी हा विजय विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणारा ठरणार असल्याचा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles