Tuesday, December 3, 2024

माझ्या जनतेच्या एका-एका मताचा उपयोग बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार

पाली,मांजरसुंबा येथील प्रचार बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त दिला विश्वास
बीड  — बीड मतदार संघातील जनता आमच्या पक्षासोबत आणि माझ्यासोबत आहे. जनता हीच खरी आमची ताकद असून विरोधकांच्या अपप्रचाराला सूज्ञ जनता कधीही थारा देणार नाही.बीड मतदार संघातील पाली असो की, बालाघाटावरील चौसाळा परिसर कायम येथील जनता खा.शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत राहिलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कितीही आरोप केले तरी त्यांना थारा न देता येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी द्या.तुमच्या एका-एका मताचा उपयोग मी बीड मतदारसंघाच्या विकासासाठी करणार असल्याचा विश्वास आ. संदीप क्षीरसागर यांनी केले

बीड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना आता मतदारसंघातील गावोगावी बीड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांचे कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी मतदार त्यांचे जोरदार स्वागत करत आहेत. गुरुवारी (दि.१४) आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील पाली, मांजरसुंबा या गावांचा दौरा करत कॉर्नर बैठकीत त्यांनी मतदारांना पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे बोलून दाखवले.
पाली व मांजरसुंबा येथील संवाद बैठकीत बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, बालाघाटवरील जनता नेहमीच खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या भूमिकेसोबत राहिलेली आहे. जेंव्हा लोक एखाद्या भूमिकेसोबत एकनिष्ठ असतात तेंव्हा नक्कीच इतिहास घडतो. बालाघाटवरील जनता यावेळी नक्की इतिहास घडवतील असा विश्वास आहे.प्रलंबित विकासकामांसाठी सतत पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन आरोप करत आहेत; मात्र माझ्या मतदारसंघातील जनता माझ्या कामाबद्दल समाधानी आहे. मी त्यांचा विश्‍वास कमावलायं,त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नाही.यावेळी त्यांनी गत पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.आम्ही विकासासाठी काम करतो असे सांगत येत्या २० तारखेला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३, ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी मला पुन्हा एकदा तुमचे सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले. सर्वसामान्य माणसाबद्दल कणव असणारे संदीपभैय्या गावी आल्याने मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहात गळ्यात पुष्पहार घालून स्वागत केले. या स्वागताने आ. संदीप क्षीरसागर भारावून गेले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles