बीड — राज्यातच नव्हे तर जिल्ह्यात देखील विरोधकावर चिखल फेक करत मतं मागितली जात असताना केज मध्ये मात्र भाजप उमेदवार नमिता मुंदडा विकासाच्या मुद्द्यावर जोर देत असल्याने विरोधकांची मात्र अडचण होत आहे.
दिवंगत नेत्या विमल मुंदडा यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाची कास धरण्याचं काम नमिता मुंदडा यांनी केलं आहे. मतदार संघामध्ये राबवलेल्या विकास योजनांच्या जोरावर त्या मतदारांकडे मत मागत आहेत. राज्यात जातीपातीचे एकमेकावर चिखल फेक करत कुरघोडीचे राजकारण करत आहेत. त्यांच्या प्रचारातून विकासाचे मुद्दे गायब झालेले आहेत असा असताना नमिता मुंदडा विकासाच्या मुद्द्यावर मत मागत प्रचार करत आहेत. प्रचारा दरम्यान विकासाचे मुद्दे उपस्थित करत असल्याने जातीय दरी कमी होऊन विकासाची नवी दृष्टी मतदारांना देखील मिळू लागली आहे. प्रचारात विकासाचा पॅटर्न त्यांनी आणल्यामुळे त्यांचा प्रचार मतदारांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. त्यामुळे विरोधकांची कोंडी होऊन प्रचार नेमका कोणत्या मुद्द्यावर करावा याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने मतदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांच्या नाकी नऊ येऊ लागले आहेत. एकंदरच मतदारांच्या वाढत्या समर्थनामुळे विरोधकांची हवा गूल होत असल्याचे चित्र केज मध्ये पाहायला मिळत आहे.