बीड — कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्या विरोधात फास आवळला असला तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीवर बसलेले
उस्मान शेख यांची कामगिरी मात्र लज्जास्पद असल्याचं पाहायला मिळत आहे. मालवणी भाषेत सांगायचं तर बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे; उस्मान शेखची हीच स्थिती
स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे एस पी ची सावली मानल्या जाते. या शाखेला जिल्ह्यात कुठेही कारवाई करायला मुभा असते. मोठ मोठाल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी या शाखेचा वापर पोलीस अधीक्षकांकडून केला जातो. मात्र बीडच्या एलसीबी शाखेची परिस्थिती मात्र दयनीय असल्याचं पाहायला मिळत आहे. बाळराजे दराडे सारखा एपीआय दर्जाचा माणूस जिल्ह्यात कारवाया करतो. गुटखा माफिया, आर्थिक घोटाळ्यातील आरोपीचा शोध घेऊन बनावट ऑईलचा कारखाना उध्वस्त करू शकतो तेही एसटीच्या सांगण्यावरून. मात्र स्थानिक गुन्हे शाखा एक दोन मोटार सायकल चोरी करणारा भुरटा चोर पकडून फुटकळ कारवाया करत स्वतःचीच मुसळाने बडवून घेत असल्याचं सध्यातरी पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षकांच्या कर्तव्यदक्षतेलाच सुरुंग लावला जात आहे.यावरून मालवणी भाषेतील म्हण मात्र पी आय उस्मान शेखच्या कारभाराला चपखल बसत आहे. कोकणात शेतीच्या वेळी झाडून सगळे शेती कामासाठी शेतावर जातात. एखादी कामाचा कमी उरक असणारी स्त्री घरी रहाते.शेतातील कामकऱ्यांच्या पेज पाण्याचे पाहणे एवढेच तिला सोपविलेले काम. अशा वेळी दुपारच्या वेळी कोणी अनाहूतपणे पाहुणा आला तर त्याचा व्यवस्थित पाहूणचार व्हावा. हा त्यामागे उद्देश असायचा. मात्र पाहुणा बघून तिची तारांबळ उडे. चुलीकडे बसुन काही शिजवण्या ऐवजी शोधाशोध करण्यात तिचा वेळ जाई. बाहेर बसलेला पाहुणा स्वयंपाकघरातल्या या हालचाली टिपे. बाईच्या इतक्या खटापटीनंतर आता आपल्याला सुग्रास अन्न मिळेल या आशेवर असलेल्या पाहुण्याला शेवटी मिळते काय तर भरपूर निवळ असलेली थोडेसेच भातगोटे असलेली उरलेली पेज आणि लोणचे. इतका वेळ स्वयंपाकघरात वावरणाऱ्या नववारीतील स्त्रीच्या हालचाली न्याहाळतांना पदरी पडले काय तर ” बारा वाजता तेरा गोटे, रांधपिणीचे कुले मोठे”. थोडक्यात मोठा भ्रमनिरास होतो ! हीच स्थिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या एपीआय उस्मान शेख कडून सध्यातरी होऊ लागली आहे.