बीड — गेल्या अनेक दिवसापासून बीड जवळील काकडहिरा शिवारात नामवंत कंपनीचे बनावट ऑइल तयार करण्याचा धंदा जोरात सुरू होता. याची माहिती मिळताच सपोनी बाळराजे दराडे यांनी छापा मारून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यावर विरोधात करडी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. सपोनी बाळराजे दराडे यांना जिल्ह्यात अवैध धंद्या विरोधात कारवाई करण्याची मुभा देण्यात आल्यामुळे दराडे यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दरम्यान बीड जवळील काकडहिरा शिवारात जिओ पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये बनावट ऑइल तयार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यावरून मंगळवारी दुपारनंतर बाळराजे दराडे यांनी छापा मारून केलेल्या कारवाईत टाटा मोटर्स, गल्फ ऑइल, भारत बेंझ चे बनावट फाईल आढळून आले. याबरोबरच ऑइल तयार करण्यासाठी लागणारी मशिनरी, मोटर्स यासोबतच तीनशे पोते युरिया चा साठा या ठिकाणी आढळून आला. यावेळी बनावट तेलाचे 300 डबे जप्त करण्यात आले.पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई सपोनि बाळराजे दराडे यांच्यासह एपीआय राठोड, मोराळे यांचा समावेश होता.