बीड — निवडणूकीच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस दल अधिक सतर्क झाले असून व्हॉट्स अॅप ग्रुप, सोशल मिडियावर पोलीसांचे विशेष लक्ष असणार आहे. कोणत्याही उमेदवाराशी संबधित,निवडणूकीबाबत किंवा धार्मिक भाषिक तसेच जातीय द्वेष पसरवणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्स अॅप किंवा सोशल मिडियातून व्हयरल झाल्या तर त्यास संबंधित व्यक्तीसह ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येईल.व त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई होईल असा इशारा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांनी दिला आहे.
शिवाजी नगर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे,सर्व व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिन, सदस्यांसह सोशल मिडिया वापरणाऱ्यांना सोमवारी एक नोटीस बजावली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू आहे. त्या अनुषंगाने सोशल मिडियावर काही निबंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवाराशी संबंधित त्याचे वैयक्तिक,कौटूंबिक,सामाजिक स्तरावर अवहेलना होईल अशा आक्षेपार्ह टिका-टिप्पनी करणे, मजकुर, फोटो (एडिट / मार्किंग),प्रसारीत करणे अथवा आलेल्या एखाद्या पोस्टवर आपले आक्षेपार्ह मत पोस्ट करणे आणि ते पुन्हा फॉरवर्ड करणे त्याचबरोबर मतदाराचे मन वळविण्यासाठी कोणत्याही धर्माच्या लोकांच्या धार्मिक, भाषिक तसेच जातीत द्वेष पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो, व्हिडीओ (एडिट / मार्किंग)) करून प्रसारीत करणे.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे स्वतंत्र सोशल मिडिया ग्रुप निर्माण करून त्याद्वारे आक्षेपार्ह मजकुर, फोटो,व्हिडीओ (एडिट मार्किंग) करून प्रसारित करणे. कुठल्याही व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये आचारसंहितेचा भंग होईल अथवा दोन गटात वाद होईल अशी पोस्ट अथवा मजकुर, फोटो, व्हिडीओ टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत व्यक्तीसह ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरण्यात येण्यात असल्याचे पोलीसांनी म्हटले आहे. सर्व व्हॉट्सग्ग्रुप अॅडमिन, सदस्यांनी या सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक असुन या संदर्भात आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास ग्रुप अॅडमिन व संबंधितास जबाबदार धरून त्यांच्याविरूध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. सदरील नोटीस संबंधीत ग्रुप अॅडमिन, सदस्य यांच्याविरूध्द पुरावा म्हणून सदरील नोटीस न्यायालयासमोर सादर करण्यात येईल अशी तंबी देखील बीडच्या पोलीस प्रशासनाने दिली आहे.