क्राईम

विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने महिलेचा मृत्यू

शिरूर — भीषण पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत.अनेक गावांमधून पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. अशातच हिंगेवाडी येथील महिलेचा विहिरीतील पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली.

हिंगेवाडी येथील चंद्रकला दगडू फुलमाळी वय 40 वर्ष या आपल्या पुतण्यासोबत पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. या वेळी विहिरीतील तुटलेल्या पायरीवरुन पाय निसटल्याने त्या खाली पडल्या. सदरील प्रकार त्यांचा पुतण्या भरत याने पाहिल्यानंतर तो घराकडे पळत गेला आणि घडलेला प्रकार सांगितला. या वेळी आजूबाजूचे लोक विहिरीकडे पळाले. परंतु तो पर्यंत मृतदेह विहिरीच्या तळाला गेला होता. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना धीर दिला मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शिरूरच्या प्राथमिक आरोग्य
केंद्रात पाठवण्यात आला. दरम्यान चंद्रकला फुलमाळी यांचे पती मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. अशातच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button