आपला जिल्हा

डोके साहेब..! प्रशासनाशी नाही, जनतेशी नाही, किमान जातीशी तरी इमान बाळगा! कुणबी प्रमाणपत्रासाठीची लूट बंद करा !!!

बीड — मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटलांसह समाजाचा प्रत्येक जण जीवाचं रान करत आहे. मात्र प्रशासनाशी प्रामाणिकपणा द्या सोडून पण नायब तहसीलदार सुरेंद्र डोके कुणबी प्रमाणपत्राच्या एप्रूवल साठी व ऑफलाइन स्वाक्षरीसाठी समाज बांधवांचीच लूट करत असल्याचं पाहायला मिळत आहे.या लुटी साठी त्यांनी जाधव नावाचा दलाल देखील नियुक्त केला आहे.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती खालावलेली असल्यामुळे आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीत गेल्या सात दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मराठा बांधवांसह प्रत्येक जण त्यांनी उपचार घ्यावा यासाठी आग्रही आहे. हे एकीकडे वातावरण असताना दुसरीकडे मात्र डोके नावाचे नायब तहसीलदार समाज बांधवांचे शोषण करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा हा खेळ देखील अजब आहे.तहसीलच्या फेरफार कार्यालयातून कुणबी नोंद आढळल्याचा पुरावा मिळवायचा असल्यास तेथे देखील दोनशे ते तीनशे रुपये नाहक खर्च करावे लागतात.
सरकार दप्तरी कागदपत्रावर ज्यांची कुणबी नोंद आढळली आहे त्यांना सेतू सुविधा केंद्रा मार्फत साठ रुपये इतक्या नाममात्र दरात प्रमाणपत्र दिल्या जाते. मात्र एप्रूवल देण्यासाठी नायब तहसीलदार सुरेंद्र डोके चाळीस रुपये अनधिकृत पणे आकारतात. पुन्हा त्यांची ऑफलाइन स्वाक्षरी घेण्यासाठी वेगळी रक्कम आकारली जाते. अर्थात ही रक्कम समोरची व्यक्ती जशी असेल त्या प्रमाणात याचा भाव ठरतो.
एप्रूवल देण्यासाठी संध्याकाळी पाचच्या नंतर सेतू केंद्र वाल्याला बोलून घेतले जाते पैसे घेऊन स्वाक्षरी दिली जाते. पैसे न देणाऱ्यांच्या त्रुटी काढल्या जातात. त्रुटी काढून प्रस्ताव पाठवलेला आहे असा शेरा मारतात विशेष म्हणजे या कागदपत्रावर तहसीलदारांची स्वाक्षरी देखील असते तरीदेखील ते पैसे दिले नाहीत म्हणून रिजेक्ट करण्याचं काम इमाने इतबारे करत आहेत. वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठी डोके यांचे दरपत्रक निश्चित झालेले आहे. त्यांनी अनाधिकृत रित्या आकारलेली रक्कम कमी वाटत असली तरी दिवसात हजारो रुपये तर महिन्यात लाखो रुपयांच्या कमाईचा आकडा ही रक्कम गाठते.
जात प्रमाणपत्रासाठी …
जात प्रमाणपत्रासाठी पन्नास रुपये घेतले जातात प्रमाणपत्र साठी तहसीलच्या पाठीमागील सतीश जाधव नावाच्या सेतू केंद्राकडून पैसे आकारण्यात येते हा सर्व खेळ तहसीलच्या पाठीमागील सतीश जाधव नावाच्या सेतू केंद्र वाल्याकडून हा सगळं गोरख धंदा केला जात आहे सतीश जाधव याला सुरेंद्र डोके यांनी खाजगीरित्या नियूक्त केलेलं आहे.
उत्पन्न प्रमाणपत्र ..
यासाठी वीस रुपयाची मागणी केली जात आहे वीस रुपये दिले तरच सेतू केंद्र वाल्यांना अप्रूवल भेटते व उत्पन्न प्रमाणपत्रावर स्वाक्षरी होते उत्पन्न प्रमाणपत्रसाठी खाजगी दलाल सक्रिय

जमानती साठी लागणारी स्वाल्वंसी…
50 हजाराची स्वाल्वंसी 500 रुपये तर एका लाखाच्या.स्वाल्वंसी1हजार रुपये लागतात हा सर्व गोरख धंदा नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी नियुक्त केलेल्या सेतू केंद्रातील खाजगी दलाला कडून केली जातो

बीड तहसील अंतर्गत 250 सेतू केंद्र …
बीड तहसील कार्यालय अंतर्गत 250 सेतू केंद्र आहेत.सेतू केंद्र वाले संध्याकाळी पाच नंतर कास्ट सर्टिफिकेट कुंणबी प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र साठी येतात व स्वाक्षऱ्या करून घेऊन जातात हा खेळ रोज रात्री बारापर्यंत सुरू असतो

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

8 Comments

  1. Just want to say your article is as astounding.
    The clearness for your post is just great and i could suppose you are an expert on this subject.

    Fine along with your permission allow me to grasp your feed to
    keep updated with approaching post. Thank you one million and please keep up the rewarding work.
    I saw similar here: sklep internetowy – zabawka.shop – and also
    here: dobry sklep (lunasolix.top)

  2. Hi! Do you know if they make any plugins to assist with SEO?
    I’m trying to get my blog to rank for some targeted keywords but I’m not seeing very good gains.
    If you know of any please share. Cheers! You can read similar art here: Sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button