क्राईम

आ.प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला करणाऱ्या 17 संशयित आरोपींना जामीन

माजलगांव — मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या 17 संशयित आरोपींना माजलगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करून, जाळपोळ करण्यात आली होती. त्याचबरोबर नगरपरिषद कार्यालय देखील पेटवून देण्यात आले होते. यामध्येच अटक करण्यात आलेल्या 17 संशयित आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.आ.प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या संशयावरून 20 लोकांच्या विरोधात माजलगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत अटक सत्र सुरु केले. याप्रकरणी एकूण 17 संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. हे सर्व संशयित आरोपी एक महिन्यापासून जिल्हा कारागृहामध्ये होते. दरम्यान, अखेर या 17 संशयित आरोपींना माजलगावच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
माजलगाव व बीड शहरातील जाळपोळीच्या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहे. या प्रकरणात लक्षवेधी झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, याची तत्काळ दखल घेत बीड पोलीस प्रशासन कामाला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवत,आंदोलनातील गुन्ह्यात जे आरोपी आहेत ते शोधून त्यांना अटक करा असे आदेश दिले आहेत. प्रत्येक गुन्ह्यांचा लवकरात लवकर निपटारा करा, अशा सूचना सुद्धा पोलिस अधीक्षक ठाकूर यांनी जिल्हाभरातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आ. प्रकाश सोळकेंचे गंभीर आरोप
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोळुंके यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, याचवेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. “अवैध धंदे आणि राजकीय विरोधकांनी कट रचून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रकाश सोळंके यांनी आरोप केला. तर यामध्ये काही शिक्षक आणि ग्रामपंचायतचे सदस्य देखील असल्याचा दावा सोळंके यांनी केला होता. काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्र देखील होती, त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे असे देखील सोळके म्हणाले आहेत.

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button