क्राईम

आ. सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धसांवर गुन्हा दाखल;महिलेचा विवस्त्र व्हिडिओ झाला होता व्हायरलं

राज्यभरात एकच खळबळ

बीड — भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर अखेर आष्टी पोलीस ठाण्यात विनयभंगांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता धस यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मागच्या दोन दिवसांपासून प्रचंड व्हायरल होतं होता. यामध्ये पारधी समाजाच्या महिला विवस्त्र असल्याचे दिसून येतं होते. अखेर याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली असून या व्हिडिओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सुरेश धस हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. बीड जिल्हा आणि इतर जिल्ह्यात ही त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यांच्या पत्नी असलेल्या प्राजक्ता धस यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. देवस्थान जमिनीत आ. सुरेश धस यांचे नाव चर्चेत असताना आता त्यांच्या पत्नीवर विनयभंगांसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. दोन दिवसापूर्वी वाळुंज येथील जमिनीच्या वादातून पीक काढत असलेल्या महिलेला मारहाण करून तिला विवस्त्र करण्यात आल्याची तक्रार पीडितेने आष्टी पोलिसांकडे केली होती. यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्राजक्ता धस,रघु पवार आणि राहुल जगदाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

       काय म्हटले आहे तक्रारीत
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे,मी शेतामध्ये मक्याचे पीक काढत असताना प्राजक्ता धस व इतर दोघे त्याठिकाणी येऊन माझ्याशी वाद घालू लागले. ही जमीन त्यांच्या मालकीची असल्याचे ते सांगतात.मात्र तसे ही नाही. शाब्दिक चकमकीनंतर पीडितेला झटपट करून मारहाण केली, आणि तिची साडी फेडली.विवस्त्र महिलेनेनंतर या तिघांचा पाठलाग केला यावेळी त्याचा व्हिडिओ पीडितेच्या सुनाने रेकॉर्ड केला आहे. दरम्यान याधआधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

.मुजोरपणा अंगलट

प्राजक्ता धस यांनी या प्रकरणात दाखविलेला मुजोरपणाचा अंगलट आल्याचे चित्र आहे. पीडितेचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरलं झाल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून प्राजक्ता धस यांनी पारधी समाजाशी वाद घालताना जो मुजोरपणा दाखविला तोच अंगलट आल्याचे दिसते.

मुख्य संपादक उपेंद्र कूलकर्णी

Share

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button