बीड – गुटखा तस्करी व विक्री प्रकरणात बीड ग्रामीण दिंद्रुड सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला फरार आरोपी आबा उर्फ महारुद्र मुळे यास बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अटक केली.मागच्या सहा महिन्यांपासून पोलीसांच्या हातावर तूरी देण्यात यशस्वी होत होता.
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना महारुद्र मुळे जमिनीच्या व्यवहारासाठी अंबडला असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार दराडे यांनी अंबडला धाव घेतली.यावेळी मुळे हा अंबडच्या बस स्थानकातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करताना पोलिसांना दिसून आला.दराडे आणि ग्रामीण पोलीस कर्मचारी दिसताच मुळेने हॉटेलमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दराडे यांच्या हाताला मोठी दुखापत झाली होती.बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्री करण्यात मुळेचा मोठा सहभाग असल्याचे पोलीस तपासातूंन समोर आले होते.सिरसाळा येथे गुटख्याचा मोठा साठा 6 महिन्यापूर्वी जप्त करण्यात आला होता.यात मुळे मुख्य आरोपी होता.त्यानंतर दिंद्रुडमध्ये एक कंटेनरच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी 70 लाखांचा गुटखा आणि बीड ग्रामीण पोलिसांनी दीड ते दोन महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईत 30 लाखांच्या आसपास गुटखा ताब्यात घेतला होता.या तिन्ही प्रकरणात त्याच्यावर गुन्हे दाखल होते. मागच्या काही काळापासून मुळे बीड जिल्हयातून फरार होता.अखेर त्याला अंबडच्या बसस्थानकातून सपोनि बाळराजे दराडे यांनी ताब्यात घेतले.या कारवाईत सतीश मुंडे,नामदेव सानप,श्री.निर्धार यांचा समावेश होता.