Home राज्य धक्कादायक! वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड

धक्कादायक! वैद्यनाथ मंदिराच्या शिखराची तोडफोड

0
16

परळी — बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळीच्या माजी नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काळसापर्यंत जाऊन तोडफोड केली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी ही घटना घडली आहे.
मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने अनेक बंधन घातली आहेत. मात्र परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह आठ ते दहा जणांनी विजया दशमीच्या दिवशी सकाळी वैद्यनाथ मंदिर कमिटीच्या कार्यालयासमोर असलेल्या गेटचे कुलूप तोडून शिखरावर पोहोचले. यानंतर हातोड्याने शिखराच्या पूर्व बाजूची भिंत फोडून दीपक देशमुख आपल्या साथीदारांसह आत घुसले. याचा व्हिडिओ दीपक देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
शिखराच्या तोडफोडप्रकरणी मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कमिटीच्या कार्यालयास माहिती दिली, त्यामुळे बाबासाहेब देशमुख यांनी तात्काळ याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रविवारपर्यंत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार आल्याचे परळी शहराचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले.
दरम्यान घडलेल्या घटनेबद्दल दीपक देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ येथे दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर कळसातील महादेव दर्शन शिव भक्तांसाठी खुले केले. अनेक वर्षापासून बंद असलेल्या कळसातील भुयारात महादेवाची पिंड बंदिस्त होती. अनेक दिवसांपासून भक्तांची व माझी मागणी होती की, हे द्वार दर्शनासाठी खुले करावे. वैद्यनाथ देवल कमिटीच्या विश्वस्तांना अनेकवेळा निवेदन दिले, परंतु काहीही दाद न दिल्यामुळे मी व माझ्या सहकारी शिवभक्तांनी मंदिरात असणाऱ्या कळसातील महादेव दर्शन सर्वांसाठी खुले केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here