मुंबई — राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
देशी गायींना यापुढे राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या खात्यामधील एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्याकडे अगदी सुरुवातीपासून गायीला खूप महत्व आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व असल्यामुळे गायीला आपण कामधेनु म्हणतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देशी गायींच्या जाती आहेत.
देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळाऊ अशा जाती आहेत. यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस ‘राज्यमाता- गोमाता’ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
देर आये मगर दुरुस्त आये आणा वैज्ञानिक दृष्टिने पण देशी गाई किती उपयुक्त आहे हे सिद्ध होते आहे आता पर्यंत आमच्या धोरणानुसार शुद्ध देशी गोवंश फारच दुर्मिळ झालाय या देशी गोवंश संवर्धन व्हावे