बीड — मोटार सायकली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पकडली. यावेळी सोळा मोटारसायकली जप्त करून चोरीचे बारा गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे
मोटारसायकली चोर गेवराई तालुक्यातील चिखली येथे येणार असल्याची गुप्त माहिती पो.स्टे. शिवाजीनगर गुरनं 470/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. या मध्ये चोरी गेलेल्या मोटार सायकलचा समांतर शोध घेत असतांना मिळाली.खात्रीलायक खबर मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना खबर देवुन त्यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी सुचना दिल्या वरुन पोउपनि खटावकर यांनी गेवराई येथे पथकासह सापळा लावुन बातमी प्रमाणे मोटार सायकल वरुन येणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेवुन नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे रमेश छबु गिरे वय 26 रा.चिखली ता.गेवराई, मच्छिंद्र बबन राठोड वय 22 वर्ष रा.मानसिंगतांडा ता.गेवराई असे सांगितले त्यांना त्यांचेकडे असलेली मोटार सायकल बद्दल विचारले असता त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले व त्यांचे कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बीड शहर, दिंद्रुड, गेवराई, पाटोदा, माजलगाव, तलवाडा, तसेच पाथर्डी, अंबड, शेवगाव परिसरातुन मोटार सायकली चोरलेल्या असल्याचे सांगितले. यावेळी आरोपींच्या ताब्यातुन एकुण 16 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. त्यापैकी 12 मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आलेले असुन बीड जिल्हयातील विविध पो.स्टे.अंतर्गत 09 गुन्हे व जालना व अहमदनगर जिल्यातील 03 असा एकुण 7, लाख63 हजार रुपयाचा मोटार सायकलचा मु्द्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपी रमेश छबु गिरे रा.चिखली ता.गेवराई याचा पुर्व गुन्हे अभिलेख पाहता त्याने पुर्वी शिरुर कासार हद्दीमध्ये जनावर चोरी केल्या आहेत. सदर आरोपीतांकडुन आणिखीन इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन दोन्ही आरोपी व 16 मोटार सायकलचा मुद्देमाल पो.स्टे.शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्याची प्रक्रिया चालु आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, स.फौ संजय जायभाये, पो.हअशोक दुबाले, कैलास ठोंबरे, दिपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड, बाळु सानप, विकास वाघमारे, अर्जुन यादव, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, विकी सुरवसे, सिध्देश्वर मांजरे यांनी मिळुन केलेली आहे.