Thursday, November 21, 2024

श्रेयवादासाठी शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या रस्त्यांना मंजुरी दिली नाही !

पालकमंत्री साहेब बीड शहरातील विकास कामात भेदभाव करू नका- खुर्शीद आलम

बीड — बीड शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील पूल) पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण व पक्की नालीबांधकाम करण्यास मंजुरी मिळून या कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते. हे समजल्यानंतर आनंद झाला. मात्र सोबतच दुःख झाले. दुःख याचे कि, केवळ श्रेयवादासाठी म्हणजे जे काही केलं ते आम्हीच केलं असे दिसावे म्हणून बीड शहरातील अक्षरशः चाळण झालेल्या इतर रस्त्यांना मात्र अनेक प्रयत्न केल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही.
बीड शहरात विविध ठिकाणी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय महाअभियान योजनेंतर्गत रस्ता व नालीबांधकाम करण्यासाठी एकूण 17 कामे प्रस्तावित होती. यामधीलच एक प्रस्तावि असलेल्या रस्त्यापैकी जालना रोड ते अमरधाम स्मशानभूमी (बिंदुसरा नदीवरील) पर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मंजुरी मिळून येत्या 8 ते 10 दिवसात मा.पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उदघाटन होऊन सुरुवात होणार असल्याचे समजले आहे. परंतु या 17 कामांपैकी बीड शहरात सध्यस्थीतीला अत्यावश्यक असलेल्या गावठाणमधील धोंडीपुरा येथील बलभीम चौक-माळीवेस चौक-राजुरी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाड गल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकी पर्यंतचा रस्ता, तसेच राजुरी वेस येथील बलभीम चौक-माळीवेस चांदणी चौकापर्यंत व अजिजपूर येथील नुरी मस्जिद ते कागदी वेस येथील पोस्ट ऑफिस-कबाडगल्ली वेस-माळीवेस पोलीस चौकीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्स्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. ही बाब लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर दि.12 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेवून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) नगर परिषद अंतर्गत टप्पा क्र.2 मधील बचत खर्चातुन सदरील कामे करण्याचे मागणी केली होती. यावर मा.जिल्हाधिकारी यांनी मा.मुख्याधिकारी यांना रितसर प्रस्ताव दाखल करण्याचे सुचविले होते. यावर मा.मुख्याधिकारी यांनी दि.26.08.2024 रोजी मा.जिल्हा सह आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना सांगुन सदरील प्रस्ताव प्रलंबित ठेवला व या कामांची मंजुरी अडवली. अशा प्रकारे बीड शहरातील अत्यावश्यक असलेल्या कामांमध्ये खोडा आणला. जालना रोड ते अमरधामपर्यंतच्या रस्त्याला तातडीने मंजुरी मिळाली याचे खरोखरच समाधान आहे. कारण हा रस्ता करणे खुप आवश्यक होते. परंतु या सोबतच आ.संदिप क्षीरसागर यांनी मागणी केलेले रस्तेही आवश्यकच आहेत. मग केवळ श्रेयवादासाठीच लोकांसाठी आवश्यक असलेली कामे अडवुण बीड शहरातील विकास कामामध्ये पालकमंत्र्यांनी अन्यायकारक भेदभाव करू नये असे न.प.चे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष खुर्शिद आलम यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles