बीड — पोलीस अधीक्षक बारगळ यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात कायद्याचं “अविनाशी“राज्य असल्याचं दाखवून द्यायला सुरुवात केली आहे. आज पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून 26 लाखाची रोकड जप्त करत हवाला रॅकेटचं कंबरड मोडण्यात यश मिळवलं.
बीड शहरात मोठ्या प्रमाणात हवाला व्यवहार चालत असून मोठी आर्थिक उलाढाल या मार्फत होत असते अशी खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली होती. यामुळे अशा व्यवहारांना चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे आदेशावरून खास पथक तयार करण्यात आले. पथकाने तीन ठिकाणी छापेमारी केली.यामध्ये छापा कबाड गल्लीमध्ये पहिला तर दुसरा छापा सारडा कॅपिटल येथे, तर तिसरा छापा जालना रोड येथील वीर हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या ठिकाणावर मारण्यात आला. तिन्ही ठिकाणाहून एकूण 26 लाख रुपये जप्त केले असून सदर पैसे कुठून आले याची सखोल चौकशी बीड शहर पोलीस करित आहेत.
पैशाची कुठलीही खात्रीशीर सुरक्षितता नसतांना, यामध्ये काही जर गैरव्यवहार झाला किंवा पैशांची चोरी झाली याबद्दल सुरक्षा नसताना अशा प्रकारचे व्यवहार होत आहे आणि यामध्ये शासनाचा महसूल बुडवणे आदी कामामुळे शासनाचे नुकसान होत आहे. यासाठी सदरील छापा हा महत्त्वाचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी दिली.
सदरील शहरात हवाला व्यवहारावर तीन ठिकाणी छापे टाकून 26 लाखाची रोकड जप्त केली पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक,सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, बाबा राठोड, पोलीस उपनिरीक्षक काकरवाल, कुकलारे, राठोड, शेख, निर्धार म्हेत्रे कांबळे, परजणे, शिरसाठ यांनी केली आहे.