बीडमध्ये मोठी कारवाई! चोरीच्या वीज तारांसह टेम्पो पकडला; 9.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड – वीज वितरण कंपनीच्या चोरीच्या अॅल्युमिनियम तारांची विक्री करण्यासाठी नेण्यात येणारा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नांदुर फाट्याजवळ सापळा रचण्यात आला. बीड-नेकनूर मार्गे केजकडे जाणाऱ्या संशयित टेम्पोची झडती घेतली असता, त्यामध्ये 1500 किलो वजनाचे अॅल्युमिनियम तारचे 12 बंडल आढळून आले.
या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक सुखदेव सुभाष गायके (वय 31, रा. धारूर) याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 4.50 लाखांची अॅल्युमिनियम तार आणि टेम्पो मिळून एकूण 9.50 लाखांचा माल समाविष्ट आहे.
दरम्यान, या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात श्रीराम खटावकर, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, अशफाक सय्यद, मनोज परझणे, सिद्धेश्वर मांजरे आणि विकास राठोड यांचा समावेश होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles