“भूगोल”च्या प्रश्नपत्रिका फुटल्या, दहावीचा पेपर होणारच !

पुणे  — राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या होणारा भूगोलाचा पेपर  दिलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोल्यात  दहावीच्या परीक्षेदरम्यान भूगोलाचे 50 पेपर चोरी गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली होती.या संपूर्ण घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने मागितला होता. त्यामुळे, उद्याच्या परीक्षेवर आणि बोर्डाच्या पेपरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, उद्या 10 वी बोर्डाचा भूगोल विषयाचा पेपर होणार की नाही असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र, बोर्डाने  दहावीचा पेपर वेळापत्रकानुसार होणार असं जाहीर केलं आहे.

उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर शेड्युलनुसारच होणार आहे, विद्यार्थ्यांनी तयारी करून शांतपणे पेपर सोडवावा असे आवाहन पुणे एसएससी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे. सांगोल्यातून उद्या होणाऱ्या भूगोलाच्या 50 पेपरची आज सकाळी चोरी झाली होती. त्यामुळे उद्याच्या पेपरबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात साशंकता होती. मात्र, उद्या ठरलेल्या वेळेप्रमाणेच भूगोलाचा पेपर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आलेले आहे.

दरम्यान, बोर्डाने पेपर घेण्याचा निर्णय घेतल्याने दहावीच्या भूगोलाच्या पळवून नेलेल्या 50 पेपरचे झेरॉक्स, फोटो कोणी काढले असेल आणि ते जर व्हायरल केले असेल तर त्याची जबाबदारी बोर्ड स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सांगोला येथील बोर्डाचे पेपर चोरीप्रकरणी प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांचेवर ठपका ठेवत शिक्षण विभागाने त्यांचे तडकाफडकी निलंबित केले आहे. याशिवाय या इथे सुरक्षेवर असणारे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्याबाबतच्या अहवालानुसार त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई होणार आहे. दरम्यान, उद्याचा बोर्डाचा भूगोलाचा पेपर ठरल्यावेळी प्रमाणेच घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी शांतपणे पेपर सोडविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles