शिरूर (का)-— आई-वडील शेतामध्ये गेल्याचा फायदा घेत सोळा वर्षीय तरुणाने सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावांमध्ये शुक्रवार दि.७-नोव्हेंबर रोजी घडली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार (१६) याच्या विरोधात शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संभाजी केदार याला पोलिसांकडून अटक ही करण्यात आली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावातील पीडित मुलीचे आई-वडील घरातील बाजार संपला म्हणून शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर रोजी बाजाराचे सामान आणण्यासाठी शिरूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचा सतरा वर्षीय मुलगा सुरज शेतामध्ये कापूस वेचणी करण्यासाठी गेला होता, तर – सहा वर्षाची पहिलीच्या वर्गात शिकत अस-लेली चिमुकली मुलगी शाळेमध्ये सकाळी 10 वाजता गेली होती.
दुपारी 1.30 वाजता शिरूर येथून बाजार करून आलेले आई-वडील पुन्हा शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेले होते. पीडित मुलीच्या आजीजवळ आई वडिलांने जेवण डब्बा ठेवून आजी साडेचार वाजता मुलगी घरी येईल तिला जेवण द्या व तिच्याकडे लक्ष द्या असे सांगून आई वडील कामासाठी शेताकडे गेली होती. आई वडील घरी नसल्याचा फायदा घेत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार वय सोळा वर्षे याने या चिमुरडीला उचलून नेऊन रिकाम्या पाण्याच्या हौदा मध्ये लैगिक अत्याचार करून त्या ठिकाणहून पळ काढला होता.सायंकाळी वाजता आई-वडील घरी आल्यानंतर त्या चिमुरडीने सर्व हकिगत रडत रडत आपल्या आईला सांगितली. परंतु या घटनेबद्दल तक्रार केली तर अब्रू जाईल आणि आम्हांला मारतील या भीतीपोटी या घटनेची तक्रार केली नव्हती. मात्र पीडित आईच्या तक्रारीवरून गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी संभाजी ज्ञानेश्वर केदार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

