बीड. — मराठवाड्यात पुन्हा पावसाने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. थोडं फार हाताशी आलेलं सोयाबीन काढणी करून शेतात पडलेला आहे त्याची नासाडी होऊ लागली आहे फळ पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रब्बी पेरणी लांबणीवर पडू लागली आहे गेल्या २४ तासांत विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या पाच जिल्ह्यातील ४० मंडळांत अतिवृष्टीची झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोरोळ मंडळात सर्वाधिक १६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुढील दोन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघरमध्ये गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव मंडळात, जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील विरेगाव, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्याच्या अंबोजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई, लोखंडी, घाटनांदूर, बर्दापूर, केज तालुक्यातील होळ, बनसारोळा, परळी तालुक्यातील परळी, नागपूर, लातूर जिल्ह्याच्या लातूर तालुक्याच्या लातूर, बाभळगाव, कासारखेडा मंडळात, अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, निलंगा तालुक्यातील निलंगा, निटूर, औराद, कासार बालकुंदा, अंबुलगा, हलगरा, भातांगळी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
उदगीर तालुक्याच्या मोघा, हेर, तोंडार, झरी, रेणापूर तालुक्याच्या रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, पळशी, देवणी तालुक्यातील देवणी, बोरोळ, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिसमाबाद, परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी, पिंपळदरी मंडळात अतिवृष्टी झाली आहे.लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान झाले. तर रब्बी पेरणीही खोळंबली आहे. येथील नदी, नाल्यांना पूर येऊन, नदीकाठच्या शेतपिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

