बीड — ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील हजारो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांना सीआयडी च्या टीमने पुण्यातून ताब्यात घेतले आहे भ्रष्टाचार प्रकरणात त्या फरार होत्या.
कुटे ग्रुप वर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर याचा परिणाम ज्ञानराधा मल्टीस्टेट वर झाला. यामध्ये ग्राहकांची हजारो कोटी रुपयांची रक्कम अडकली गेली. गडगडलेला कारभार सांभाळताना सुरेश कुटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवा प्रत्येकाचा पैसा दिला जाईल मला थोडा वेळ द्या असा आवाहन करून वेळ मारून नेली. ज्ञानराधा मध्ये अडकलेला पैसा मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जात असताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे पती-पत्नी अनेक दिवस भूमिगत झाल्यासारखे झाले. दरम्यानच्या काळात दोघा जोडीने कुटे ग्रुपच्या मालमत्तेची विल्हेवाट लावल्याचं उघडकीस आलं
पोलिसांनी सुरेश कुटेला अटक केल्यानंतर अर्चना कुटे पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या होत्या मात्र पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आशीर्वादाने त्या राजरोसपणे निघून गेल्या. त्यानंतर त्या फरार आहेत पोलीस शोध घेत आहेत असं सांगितलं गेलं असलं तरी जनतेच्या बुडवलेल्या पैशाच्या जोरावर अटक टाळणं आतापर्यंत शक्य झालं.मात्र छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून काही वेळापूर्वी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला .सुरेश कुटे आणि कुलकर्णी यांच्या अटकेनंतर अर्चना कुटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती.अखेर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे यांना छत्रपती संभाजीनगरच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

