बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मोबाईल मधील डाटा रिकव्हर करण्यात यश आले आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने एस आय टी ने सुदर्शन घुले ची कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. यावेळी तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे.याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे. यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे. त्याचा तपास करायचा आहे, असं किरण पाटील म्हणाले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली