बीड — गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत केज मतदार संघात प्रबळ उमेदवार नसल्यामुळे मतदारांची कोंडी झाली होती. पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा कासरा जनतेच्या हातात राहण्याऐवजी तो त्यांच्या सासऱ्याच्या हातात राहिल्याने जनतेला मस्तवाल पणाला मग्रुरीला दंडेलीशाहीला सामोरे जावे लागले. विकासाला देखील खिळ बसल्याने या निवडणुकीत मुंदडाच्या फुग्यातली हवा निघू लागली आहे.
“नंदू सबका बंधू”हा डायलॉग चित्रपट प्रीमियम मध्ये प्रसिद्ध आहे. याच अभिनेत्याने वेगवेगळ्या चित्रपटात साकारलेल्या भूमिका या डायलॉगच्या विरुद्ध आहेत. व्हिलन म्हणूनच त्या जास्त नावाजलेल्या आहेत. याच भूमिकांचा अनुभव केजकरांना गेल्या पाच वर्षात अनुभवायला मिळाला. आपल्या समस्या सभागृहात मांडता याव्यात त्या सुटाव्यात, विकासाची नवी दिशा मिळावी यासाठी लोकशाहीत लोकप्रतिनिधीला महत्त्व आहे. मात्र जनमताचा कौल मिळून देखील आपला कारभार जर तिसराच हाकत असेल तर मतदारांची कुचंबना होऊन विकासाला खिळ बसत मतदारांना अपमानाला सामोरे जावे लागते.”भीक नको पण कुत्रा आवर”असं म्हणण्याची स्थिती निर्माण होते. अगदी अशीच अवस्था केज मतदार संघातील जनतेची झाली आहे. जनतेने निवडून दिलेल्या उमेदवाराचा “कासरा“चक्क सासऱ्याच्या हातात गेला. त्यामुळे आपली व्यथा घेऊन गेलेल्या गोरगरीब जनतेची व्यक्तिगत चौकशी करून त्याला हाकलून लावण्याचा फंडा राबवला गेला. जिथ लोकप्रतिनिधी आपला शब्द ओलांडत नाही तिथे जनतेची बिशाद कशी राहणार? अशा माणसाचा तोरा कसा असणार? याचा विचार करूनच अनेकांनी गप पडीची गोळी घेऊन शांत राहण्यातच धन्यता मानली शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? त्याच्या विरोधात जावं तर आपलाच फडशा पडणार? यासारख्या दुर्दैवाला जनतेला सामोरे जावे लागले. पुन्हा निवडणुकीत तोच उमेदवार विजयी झाला तर पुन्हा मतदार संघातील कामकाजाचा कासरा सासर्याच्याच हातात जाणार असल्याची भीती जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.ही चूक या निवडणुकीत होणार नाही याची काळजी जनता आता मात्र घेऊ लागली आहे. सक्षम पर्याय देऊन विकासाच्या वाटेवर केज मधील मतदार चालणार असल्याचं चित्र सध्या निर्माण होऊन मुंदडा विरोधात रोष व्यक्त होऊ लागला आहे

