आपला जिल्हा

जिल्ह्यात सापडले 115 कोरोना रुग्ण; बीडमध्ये सर्वाधिक 40 तर माजलगाव मध्ये 21

बीड — सरकारी नियमांचे पालन जनतेकडून होत असल्यामुळे कोरोना चे संक्रमण वाढतच असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 658 जनांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री बारा वाजता मिळाला असून 543 जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत तर 115 रुग्ण सापडले आहेत. बीडमध्ये 40, माजलगाव मध्ये 21 परळीत 15 गेवराई सहा, केज मध्ये 14, अंबाजोगाई 9, रुग्ण सापडले
बूधवारी 52 जण कोरोनामूक्त झाले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.मात्र या अहवालात देखील शतकाचा पार केला .
अंबाजोगाईत नऊ रुग्ण सापडले असून पाच रुग्ण शहरातील आहेत तर चार रुग्ण ग्रामीण भागातील आहेत . बाभळगावातील तर पिंपळा धायगुडा मधील तीन रुग्ण आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक चाळीस रुग्ण सापडले आहेत. वडार वस्ती पोथरा, भवानवाडी येथील दोन रूग्ण वगळता उर्वरित 38 रुग्ण शहरात सापडले आहेत. धारूर मध्ये पाच रुग्ण सापडले असून गोपाळपुर वगळता सर्व रुग्ण शहरातील आहेत. केजमध्ये 14 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कानडी माळी, जाधव जवळा, धर्माळा, सारणी सांगवी, येथे रुग्ण सापडले. अकरा रुग्ण शहरातील आहेत. माजलगाव तालुक्यात 21 रुग्ण सापडले. किट्टी आडगाव, शिंदेवाडी, चिंचगव्हाण याठिकाणी एक एक रुग्ण सापडला. परळी तालुक्यात पंधरा रुग्ण सापडले असून इंजेगाव जलालपूर, दादाहरी वडगाव येथे चार रूग्ण सापडले आहेत. शिरूर तालुक्यात चार रुग्ण सापडले असून घाटशिळ पारगाव मध्ये दोन तर आनंदगाव मध्ये व शिरूर मधील एक रुग्ण सापडला आहे. वडवणी शहरात एक रुग्ण तर गेवराई मध्ये सहा रुग्ण सापडले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close