बीड — दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी याहीवर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती सोहळ्यास सर्व बीडकर बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे बीड शहरात आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून भव्य दिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी केली जात आहे. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शिवजयंती साजरी होत आली आहे. दरवर्षी प्रमाणे बीडच्या सांस्कृतिक परंपरेनुसार सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शासकीय महापूजा आणि सायंकाळी ६:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व बीडकरांनी या शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होऊन भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे साक्षीदार व्हा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
ही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणं
– तब्बल ४५० ढोलताशांचे ‘करवीर नाद’ नावाचे सुप्रसिद्ध असलेल्या ढोलताशा पथकाचे सादरीकरण
🔴 ‘तिबेटियन मॉंक’ अर्थात तिबेट देशातील धर्मगुरूंचे जगप्रसिद्ध असलेले ‘शाओलीन मार्शल आर्ट’
🔴 पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाचे पथक ऍक्रोबाईक्स आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करणार.
🔴 ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथक आपली कला सादर करणार.
🔴 आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईट आणि लेजर शो.
महिला, वृध्द आणि बालकांसाठी असणार विशेष बैठक व्यवस्था
दरम्यान या कार्यक्रमामध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. जेणेकरून महिला भगिनींनाही कार्यक्रमाचा आनंद घेता यावा. तसेच कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही समितीकडून सांगण्यात आले आहे.

