सांगवीत मुलांना सापडली अडीचशे चांदीची नाणी; उत्खननाची मागणी

आष्टी — घराच्या बांधकामासाठी उकरलेल्या मातीत ब्रिटिश कालीन चांदीची नाणी सांगवी पाटण मध्ये खेळणाऱ्या मुलांना सापडली. शनिवारी ही घटना उघडकीस येताच प्रशासनाने धाव घेऊन अडीचशे नाणी जप्त केली आहेत. जमिनीखाली आणखी साठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सांगवी (पाटण) मध्ये शशिकांत नारायण खूटाळे यांच्या घराचे बांधकामासाठी पाया खणण्याचे काम सुरू होते. यातील मातीचा बाजूला ढिगारा केलेला असताना शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही मुले या ढिगार्‍यावर खेळत बसली. यावेळी त्यांना एका गाडग्यामध्ये चांदीची नाणी सापडली ती त्यांनी खिशातही भरली. ही बाब मालकाच्या लक्षात येताच मुलांना दमदाटी करून ती नाणी काढून घेतली. यामुळे सगळ्या गावात या घटनेची चर्चा रंगली. ही बाब प्रशासनाच्या कानावर गेल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली गेली. पहिल्या दिवशी प्रशासनाने 98 तर दुसऱ्या दिवशी 152 नाणी जप्त करण्यात आली. हि नाणी ब्रिटिश कालीन असून 1941 असा नाण्यांवर उल्लेख करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेली ही अडीचशे नाणी शुद्ध चांदीची असल्याचं सांगितलं जात आहे. या जागेत आणखी मोठा खजिना असण्याची शक्यता वर्तविली जात असून पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करावे अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles