सरकारची अडचण वाढली! मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरू

जालना — ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील शनिवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.सगेसोयरे अध्यादेश काढून 26 जानेवारी रोजी एक वर्ष होत आहे. परंतु, अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आजवर कधी झाले नाही ते मराठ्यांच्या बाबतीत घडत आहे. त्यामुळे आपण पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणत्र देण्याचा शासनादेश काढावा, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तातडीने करावी, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना मिळालेल्या सगे सोयऱ्यांच्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, न्या. शिंदे यांच्या समितीला मुदतवाढ द्याची, प्रमाणपत्र वाटपासाठी कक्ष सुरू करावे, शिंदे समितीला उर्दू, फारशी, मोडीलिपीचे अभ्यासक द्यावेत, ज्यांच्या नोंदी असूनही प्रमाणपत्र दिलेले नाही त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घ्यावेत. हैदराबाद संस्थानचे गॅझेट, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles