Sunday, December 14, 2025

संदीप क्षीरसागरांची उमेदवारी निश्चितच! विजयासाठी परिस्थिती अनुकूल बनू लागली

बीड — तरुण, विकासाची दृष्टी असणारा, सामान्यां मध्ये मिसळणार नेतृत्व बीड मतदार संघाला संदीप क्षीरसागरांच्या रूपाने मिळालं अन् नव विचाराला चालना मिळाली.गावागावात निर्माण होणारे तंटे बखेडे बंद झाले. यातून विकासाची वाट मोकळी झाली. त्यामुळे मतदार संघासाठी आशेचे (सं) दीप उजळले गेले असल्यामुळे या निवडणुकीत उमेदवारी तर मिळणारच पण विजयाची वाट सुकर होण्यासाठी उजवी गुढी निर्माण होऊ लागली आहे.

बीड क्षीरसागरांचं पूर्वीपासून प्राबल्य असणारा हक्काचा मतदारसंघ.यातच चौसाळा मतदार संघ सामील झाल्यानंतर ही ताकत आणखी दुणावली. पण मतदार संघाला मिळालेलं नेतृत्व मात्र गावागावात दोन गट तयार करायची. त्यांच्यात रस्सीखेच सुरू ठेवायची. यातून निर्माण होणाऱ्या वाद विवादातून गावातली इत्यंभूत माहिती मिळवायची. या माहितीच्या जोरावर जनतेला झूलवत विकासापासून दूर ठेवायचं. गाव खेड्यातला प्रत्येक माणूस तंट्या बखाड्यातून आपल्यापर्यंत आलाच पाहिजे ही नीती वापरली जायची. या सर्व गोष्टीचा उबग येऊन जनतेने कुचकामी माणसंही अनेक वेळा निवडून दिली.मात्र 2019 ला संदीप क्षीरसागर सारखं तरुण नवविचाराच्या नेतृत्वाला संधी दिली. संदीप क्षीरसागर ने देखील जनतेत मिसळण्याची त्यांच्या दुःखात सहभागी होण्याची संधी कधी सोडली नाही. प्रत्येक जण वाड्यावरच यावा हा अट्टाहास धरला नाही. गावातील दोन गट संपल्यामुळे जनतेला स्व विकासाकडे लक्ष देता आलं. वादविवाद जिथल्या तिथं गावपातळीवरच मिटल्या गेली. ही जमेची बाजू मतदार संघाच्या विकासाला चालना देणारी ठरली. त्यामुळे नव विचारांचा प्रवाह जनतेत आपोआप मिसळला गेला. पाच वर्षाच्या राजकारणात ज्यांचा स्वार्थ साधला गेला नाही.अशा स्वयंघोषित नेत्यांनी वेगळी वाट धरली. पण जाता जाता बदनामी करण्याचा डाव देखील आखला. पण तो फारसा यशस्वी ठरलाच नाही. मध्यंतरी जातीय समीकरणांची वावटळ सुटली गेली. पण लोकसभा निवडणुकीत मी जनतेसाठी जाती-धर्माच्या चौकटीत अडकणार नाही , सत्यालाच स्थान दिलं जाईल
असा संदेश देत विधानसभेला मतदार संघातून बजरंग सोनवणे ना सर्वाधिक मतांची गोळा बेरीज पदरात घातली. ही गोळाबेरीजच बजरंग सोनवणे यांच्या विजयाची नांदी ठरली. तर त्यातही अनेकांनी दूषणं देण्याचा प्रयत्न केला.पण या सर्व घटनांमधून जनतेच्या मनामध्ये वेगळी प्रतिमा निर्माण करण्यात संदीप क्षीरसागर यांना यश आले. मतदार संघात विरोधक सोडता संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बोलणारा सामान्य नागरीक शोधूनही सापडत नाही. आणखी जमेची बाजू काय असते?
वरचेवर राजकीय समीकरणे जुळली जाऊन संदीप क्षीरसागर यांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून येण्यावर शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. उजवी गुढी निर्माण होऊ लागली आहे. या निवडणुकीत उमेदवारी तर निश्चित आहेच. पण डॉ. ज्योती मेटे सारख्या उच्चविद्याविभूषित व उच्च पदस्थ अधिकाऱ्या राहिलेल्या तसेच मजबूत मराठा असलेल्या व्यक्तिमत्त्वाची साथ संदीप क्षीरसागर यांना मिळणार आहे. ज्योती मेटे यांना विधान परिषदेची येणाऱ्या काळात उमेदवारी मिळण्याची आशा प्रबळ झाली आहे.
एकूणच संदीप क्षीरसागरांच्या या निवडणुकीतील वाटचालीतील अनेक अडथळे दूर होत बाजू भक्कम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles