बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती पुष्पाताई श्रीधरराव पांगारकर यांचे सोमवार दि.22 रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 79 वर्षाच्या होत्या.
माजी नगरसेवक सुनिल पांगारकर आणि डॉ.गणेश पांगारकर यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाताई श्रीधरराव पांगारकर या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर बीड येथेच उपचार सुरू होते. सोमवार दि.22 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पाच मुली, सुना नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी बार्शी रोडनजीक श्री भगवान बाबा प्रतिष्ठान जवळील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीमती पुष्पाताई या स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या बरोबरच, राजकीय. धार्मिक. सामाजिक आणि सांप्रदायिक कार्यक्रमात सहभागी असायच्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पांगरकर कुटुंबीयांच्या दुखात “सह्याद्री माझा” सहभागी आहे

