“प्रामाणिक समाजसेवकांवर खोटे गुन्हे ही लोकशाहीची शोकांतिका इंजि. सादेक इनामदार यांची पत्रकार परिषदेत भावनात्मक प्रतिक्रिया
बीड — भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि निस्वार्थ समाजसेवेसाठी ओळखले जाणारे सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सादिक इनामदार यांच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा खोटा असून तो सूडबुद्धीने दाखल करण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
बीड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत इनामदार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मी आजवर अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी व उकल केली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक भरतीतील कथित गैरप्रकार उघडकीस आणल्यामुळेच माझ्यावर दबाव आणण्यासाठी व बदनाम करण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती प्रियाराणी पाटील यांच्या द्वारे खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, गुन्हा दाखल झाला तेव्हा मी धारूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होतो, त्याचबरोबर, वैध शस्त्र परवाना असूनही कोणताही गैरवापर न करतानाही माझा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला, हे माझ्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर आहे.
“माझ्या जीवाला काही धोका झाला, तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जबाबदार असतील,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेद्वारे इंजिनीयर सादिक इनामदार यांनी खालील मागण्या केल्या दाखल खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे.माझ्या जीवितास धोका असून मला तात्काळ शस्त्र परवाना परत बहाल करण्यात यावा जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही इनामदार यांनी दिला.

