Wednesday, April 23, 2025

शाळकरी मुलाचे अपहरण; एका तासात सुटका आरोपी जेरबंद

बीड — पांगरी रोड भागातून एका शाळकरी मुलाचे अपहरण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी अशोक दुबाले व मुन्ना वाघ यांनी गतीने तपास करत आरोपीला बेड्या ठोकत मुलाची सुखरूप सुटका केली सायंकाळी 6 च्या सुमारास ही घटना घडली होती.
बीड शहरातील पांगरी रोड भागातून एका 9 वर्षीय मुलाला जगदीश गायकवाड रा. अंबिका चौक,बीड या आरोपीने अपहरण करून पळविले होते.आरोपी बीड बसस्थानकाकडे आला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे
शाखेने मुलाची सूटका करत मोठी कामगिरी बजावली आहे. सदर मुलाच्या वडिलांना फोन करून आरोपी गायकवाड याने पाच लाखांची मागणी देखील केली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधिक्षकांनी यात स्वतः लक्ष घालून तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोपी सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याला
शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी दुबाले आणि वाघ यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles