म्हाळसजवळा येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामाची पाहणी करून जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना
बीड — सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना पाण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांची धावपळ सुरू आहे. शनिवार (दि.१२) रोजी भर उन्हात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी म्हाळसजवळा येथे जाऊन सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि शहरातील नागरिकांना वेळेत पाणी मिळावे यासाठी आमदार क्षीरसागर यांचा प्रयत्न सुरू आहे.
सध्या उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील होऊ लागला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे काम म्हाळसजवळा परिसरात सुरू आहे. शनिवारी दुपारी भर उन्हात आ. संदीप क्षीरसागर आणि माजी आ. सय्यद सलीम यांनी म्हाळसजवळा येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत तसेच काम अधिक गतीने पूर्ण करण्याचेही निर्देश दिले आहेत.