Sunday, December 14, 2025

शरद पवार गटातून परळीत राजेसाहेब देशमुख तर माजलगावात मोहन जगताप लढणार

मुंबई — राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी च्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत.कारण, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे.

त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाने आत्तापर्यंत 80 उमेदवारांची घोषणा केली असून काँग्रेसनेही उमेदवारांच्या नावांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानेदेखील (NCP) उमेदवारांच्या दोन याद्या यापूर्वीच जाहीर केल्या असून आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन यादीत राष्ट्रवादीने 67 उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर माजलगाव मतदार संघातून मोहनराव जगताप यांचे नाव निश्चित केले गेले आहे. तत्पूर्वी जयंत पाटील यांनी वांद्र रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेवरुन राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी 22 उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आमदार राहुल मोटेंना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. आता, तिसऱ्या यादीतून या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान, माण खटाव विधानसभा मतदारसंघासाठी यांंचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालंआहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापूर्वी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत माळशिरसमधून अखेर उत्तम जानकर यांचे नावं घोषित करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड करण्यात आल्याचे बोलले जात आहे. महायुतीकडून उत्तम जानकर विरोधात कोण रिंगणात असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, माढ्यातून आणि करमाळ्यातूनही महायुतीचा उमेदवार कोण असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

1. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles