Sunday, February 1, 2026

व्यायाम करणाऱ्या तीन तरुणांना बसने चिरडले; पोलीस व्हायचे स्वप्न भंगले

बीड — पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने चिरडल्याची दुर्दैवी घटना घोडका राजुरी जवळ आज पहाटे घडली. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रस्त्यावर अक्षरशः रक्त मांसाचा सडा पडला होता.

घोडका राजुरी येथील तरुण पोलीस भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी रनिंगची प्रॅक्टिस करत होते. याच वेळी बीडहून परभणी कडे भरधाव वेगाने जाणारी बीड परभणी गाडीने या मुलांना जोराची धडक दिली. या घटनेत तिघा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जणांनी वेळीच रस्त्याच्या बाहेर असलेल्या खड्ड्यांमध्ये उडी मारून आपला जीव वाचवला. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे वय २० वर्ष , विराट बब्रूवान घोडके व 19 वर्ष तसेच ओम सुग्रीव घोडके वय 20 वर्ष यांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles