वैद्यनाथ मंदिराच्या नवीन दर्शन मंडपातच शिजवले मांसाहारी अन्न

परळी — वैद्यनाथ मंदिर परिसरात सध्या तीर्थक्षेत्र विकासाची बांधकामे सुरु आहेत. मात्र वैद्यनाथाच्या पूर्व प्रवेशद्वारावरच कंत्राटदाराकडे कामाला असलेल्या कामगारांनी नियोजित दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार समोर आला असल्याने खळबळ माजली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला आहे.मंदिर परिसरात कामे करतांना ऐतिहासिक, धार्मिक महत्व लक्षात घेवून कामे करावी अशा वारंवार सुचना लोकप्रतिनिधी देत असतात. मात्र, तरीही दर्शन मंडपातच चुल मांडून आम्लेट आणि मांसाहारी अन्न शिजवल्याचा प्रकार प्रकार समोर आला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याच इमारतीच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांबाबत सबंधित गुत्तेदाराला खडे बोल सुनावले होते. आता तर वैद्यनाथ मंदिराच्या परिसरात धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानल्या जाणाऱ्या ठिकाणीच मांसाहार शिजवल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली असून या विरोधात काय कारवाई होते याकडे लक्ष लागलेले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles