वंजारवाडी तलाव आणि पाट दुरूस्तीच्या कामाला १ कोटी ७ लाखांचा निधी

0
119

राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यातून मार्गी

बीड — वंजारवाडी लघु प्रकल्प तलाव दुरूस्ती आणि पाट दुरूस्तीच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १ कोटी ७ लाखांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. सदरील काम हे निविदास्तरावर असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून हा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
               बीड तालुक्यातील वंजारवाडी लघू प्रकल्प असलेला तलावाचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ही १०५२ हेक्टर आहे. तलाव म्हणजे राजूरी परिसरातील ८ ते १० गावांना शेती सिंचनासाठी पूरक ठरू शकणारा स्त्रोत आहे.‌ परंतु सदरील तलावाचे काम मोठ्या कालवधीपूर्वी झाल्यामुळे याठिकाणी मुख्य बांधकाम कमकुवत होणे, त्यातून पाण्याची गळती होणे, सांडव्याची दुभाजक भिंत मोडकळीस आली होती‌. त्यामुळे येथे आवश्यक ती दुरूस्तीची कामे होणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन राजूरी परिसरातील शेतकरी बांधवांनी आदर्श गाव वंजारवाडीचे सरपंच वैजनाथ तांदळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे मांडला. त्यावर आ.क्षीरसागर यांनी या संदर्भात शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी वंजारवाडी तलाव आणि पाटदुरूस्तीच्या कामासाठी १ कोटी ७ लाख रूपयांचा भरघोस निधीसह मंजूरी मिळाली आहे.आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राजूरी, वंजारवाडी आणि परिसरातील गावांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

डोमरी तलावाचे पाणी वंजारवाडी तलावात आणण्यासाठीही पाठपुरावा सुरू, स्व.अजितदादांनीही दिले होते निर्देश

   मागील अनेक वर्षांपासून डोमरी तलावामध्ये अतिरिक्त असलेले पाणी वंजारवाडी तलावात वळविण्यासाठी मागणी आहे. आ.संदीप क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून डोमरी तलावातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी वंजारवाडी तलावात लिफ्टींगद्वारे आणण्यासाठी आणि वंजारवाडी धरणाची उंची वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. दरम्यान सन २००७ मध्ये स्व.अजित दादा पवार जलसंपदा मंत्री असताना, डोमरी धरणातील अतिरिक्त पाणी वंजारवाडी धरणात वळवणे आणि वंजारवाडी तलावाची उंची वाढविण्याचा कामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here