Sunday, December 14, 2025

लिपिक असलेल्या बीडच्या तरुणांने शिलाई मशीनच्या कात्रीने केला पत्नीचा खून

पुणे — शिलाई मशीनच्या कात्रीने पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे खराडीतील तुळजा भवानी नगर परिसरात घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असून हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला .आरोपी पती मूळचा बीड चा आहे

मूळचा बीडचा असलेल्या शिवदास गीते न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतो. खडकी भागात भाडेतत्त्वावर खोली घेऊन तो राहत होता. गेल्या काही दिवसापासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. बुधवारी पहाटे देखील दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गीते याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गीतेच्या गळ्यावर वार केले या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. अर्धा ओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी जखमी ज्योती गीतेस तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ज्योतीला मृत घोषित केले. दरम्यान शिवदास गीते याने घटना घडल्यानंतर सर्व प्रकरणाचा व्हिडिओ शूट करून व्हाट्सअप वर टाकला. या व्हिडिओमध्ये त्याने मला मारायचा प्रयत्न केला आहे मला उशिरा कळालं माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला माझी इच्छा नव्हती तिला मारावं किंवा काही करावं माझ्या घरची लक्ष्मी होती. असं म्हटलं आहे. हिने माझ्या मुलाला जन्म दिला असून तिच्या भावाने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मला तिला मारावा लागलं मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 2016 मध्ये ज्योतीचे वय 27 वर्ष तसेच शिवदास गीते वय 37 वर्ष याच्याशी लग्न झाले होते. या दांपत्याला अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा आहे. ज्योती गीते ही शिलाई मशीन ने कपडे शिवणे तसेच जुन्या भांड्याचे काम करत होती. तर शिवदास गीते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे तेनु म्हणून कार्यरत आहे. शिवदास हा तिच्या पत्नीवर अनेक वेळा चारित्र्यावरून संशय घेत होता यातून त्यांच्यात अनेक वेळा वादविवाद होत होते. 15 जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदास ला सांगत होती. 22 जानेवारी रोजी ज्योतीचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास त्रास देत असल्याचे सांगितले होते त्यानंतर संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ज्योती तिच्या पतीला परीक्षांचे अभ्यास करण्यास सांगत होती याचा राग आल्याने शिवदास याने शिलाई मशीन साठी वापरण्यात येणारी कात्रीने वार करून ज्योतीचे निर्गुण हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात ज्योती पडलेली असताना मुलाला खुर्चीवर बसून त्याने व्हिडिओ शूट करून सर्व हाकिकत सांगितली. शिवदासने स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी देऊन घटनाक्रम सांगितला. चंदन नगर पोलीस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles