Sunday, December 14, 2025

राजेंद्र मस्केंचा भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

बीड — राज्यात विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. आखाड्यात उतरवण्यासाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत.दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभे आधी मोठा धक्का बसला आहे.

पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. राजेंद्र मस्के हे भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी पोस्ट करून याची माहिती दिली.
राजेंद्र मस्के यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, मी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. यासह भारतीय जनता पक्षाचा त्याग करत आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांची बीड विधानसभेची भूमिका जाहीर केली होती.
खुद्द पंकजा मुंडे यांनीच राजेंद्र मस्के बीड विधानसभा लढणार असं आधीच जाहीर केलं होतं. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मस्के यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. त्यांनी अचानक हा निर्णय का घेतला हे अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles