चौसाळा – योग हा जीवनशैलीचा भाग आहे. जो आपल्याला अधिक निरोगी आनंदी आणि शांत जीवन जगण्यास मदत करतो असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.पंडित खाकरे यांनी केले कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जागतिक योग दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी योगगुरु प्रा. डॉ. सुधाकर वनवे , डॉ विलास भिलारे कमविचे उपप्राचार्य प्रा. गणपती ढवळशंख उपस्थित होते पुढे बोलताना प्राचार्य खाकरे म्हणाले की, आचरण शुद्ध ठेवणे, श्वासावर नियंत्रण, शरीराची लवचिकता व लयबद्ध हालचाल ही योगाची चत:सुत्री असून तज्ञ योगगुरू च्या मार्गदर्शना खाली त्याचा नियमित सराव करावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी योगगुरू डॉ. सुधाकर वनवे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राचार्य व कर्मचारी यांच्या कडून प्राणायाम व आसने यांचा सराव करून घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अमर आलदे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. संजय कदम यांनी केले. या साठी क्रीडा विभागाचेही सहकार्य लाभले योगदिन कार्यक्रमासाठी प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

