बीड — नगरपालिका निवडणुकीत कधी नव्हे ती डॉक्टर लॉबी सक्रिय झाली आहे. काही अपवाद वगळता डॉक्टरांचा बीडकरांना चांगला अनुभव नाही.गोरगरीबांना आजारी असताना मदतीचा हात मिळावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या योजना हडपण्याचा तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा धंदा नावारूपाला आलेला आहे. मग अशा डॉक्टर लॉबीतील उमेदवाराला जनतेच्या मानगुटीवर बसवण्याचा धंदा योगेश क्षीरसागरांनी केला आहे. जनतेला लुटणाऱ्या डॉक्टरांच्या लॉबीतील उमेदवाराला लोकांनी का स्वीकारायचं असा मोठा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
बीड शहरात बोटावर मोजण्या इतकेच चांगले डॉक्टर आहेत. बाकी रुग्णांना कसं लुटायचं याचे वेगवेगळे हातखंडे अवलंबणाऱ्या डॉक्टरांची संख्या लक्षणीय आहे. वारंवार प्रसारमाध्यम यावर आवाज उठवित आले आहेत. सर्वसामान्य जनता डॉक्टरांच्या लॉबी पुढे हवालदिल झालेली आहे. जनतेच्या जीवाची बीडच्या नागरिकांच्या सुरक्षेची त्यांच्या विकासाची एवढीच काळजी आहे तर आज पर्यंत जनतेसाठी या लॉबी विरोधात योगेश क्षीरसागर यांनी दंड का थोपटले नाहीत. याच डॉक्टर लॉबीच्या सुपिक डोक्यातून नगरपालिकेला उमेदवार देऊन निवडून आणायचा अशी कल्पना आली. ती मूर्त रूपात देखील आणली गेली. डॉ. लॉबीतील उमेदवाराला योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाच्या रणांगणात उतरवण्यात आलं. याच डॉक्टर लॉबीचा बीडच्या जनतेला फारसा चांगला अनुभव नाही. कमी पैशात चांगले उपचार घ्यायचे असतील तर आजही औरंगाबाद पुणे सारख्या ठिकाणी लोकांना जावं लागतं हे दुर्दैव आहे. लॉबीतील उमेदवारच जनतेच्या माथी मारण्यासाठी स्व. काकूंची धर्मनिरपेक्षतेची शाल अक्षरशः पायदळी तुडवली.धर्मांध पक्षाची साथ घेत नगरपालिका आपलीच जहागिरी आहे. कसं ही जनतेला वेड्यात काढलं तरी ती जनता आपल्याच हातात देणार हा आत्मविश्वास असल्याने हे सगळं महाभारत घडलं.
राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने रुग्णांना चांगले उपचार मिळावेत त्यांना अशा संकटाच्या काळात मदतीचा हात मिळावा यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,बांधकाम कामगार आरोग्य योजना यासारख्या अनेक योजना चालू केलेल्या आहेत. या योजना हडप करायचा मोठा धंदा बीडमध्ये चालू आहे. एवढ्यावरच भागत नाही तर लाखो रुपयांची बिल रुग्णांच्या नातेवाईकांच्या माती मारून पैसे उकळण्याचा धंदा देखील राजरोस केला जात आहे. या संदर्भात अनेक तक्रारी सरकार दरबारी पडून आहेत. डॉक्टर लाॅबी विरोधात जनतेची असलेली नाराजी
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात समोर येऊ लागली आहे. योगेश क्षीरसागर यांना जनसेवेचा एवढा पुळका आहे. निवडणूक लढवून जनहिताचा विचार करायचा आहे तर मग या गोरगरिबांची लूट करणाऱ्या लॉबीच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत आवाज का उठवला नाही. मग नगरपालिकेच्या माध्यमातून जनहित ते काय साध्य करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
या निवडणुकीत डॉक्टर लॉबीच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याची संधी या वेळेला हातची जाऊ द्यायची नाही असं बीडची जनता उघड उघड बोलून दाखवू लागली आहे.

