Sunday, December 14, 2025

माहिती अधिकार महासंघाचे १४ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे अधिवेशन 

सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे यांच्या हस्ते उद्घाटन ; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे :- डॉ.गणेश ढवळे

बीड —  माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (फेडरेशन) ही महाराष्ट्रातील ही जागरूक नागरीकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची सर्वात मोठी संघटना असुन महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासुन ते सायंकाळी ४ पर्यंत शिव छत्रपती रंगभवन ,शांतीसागर महाराज चौक ,सोलापुर येथे आयोजित केले आहे.या अधिवेशनासाठी राज्याच्या ३५ जिल्ह्यातुन सुमारे पाचशेच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ चे डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.


या अधिवेशनाचे उद्घाटन नाशिक येथील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या हस्ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार असुन कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे अधिवेशन यशस्वी व्हावे यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या सोलापूर टीमने जोरदार तयारी सुरू केली आहे.
शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक असावे व त्यात नागरीकांचा सहभाग असावा या उदात्त हेतूने अनेक समाज सेवकांच्या अविरत संघर्षानंतर माहिती आधिकार अधिनियम हा कायदा अस्तित्वात आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर खुपच उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.नागरीकांना हक्क व अधिकार देणारा हा कायदा शासनाला नकोच आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांनी यात सहभागी होणे व या कायद्याचा सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज असुन जागरूक व प्रामाणिक नागरीकांचा मोठा दबावगट निर्माण झाला तरच माहिती आधिकार कायदा वाचणार आहे. हा कायदा वाचावा त्याचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार व्हावा यासाठी माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे अविरत प्रयत्न चालुच आहेत असे नमुद करत या अधिवेशनामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील जागरूक नागरिकांनी व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सामिल व्हावे असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles