
बीड — रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने देण्यात येणारा मानाचा चंपावतीरत्न पुरस्कार यंदा राज्याचे माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे दि 22 मार्च रोजी हॉटेल निलकमल मध्ये ग्लोबल विकास ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी मयंक गांधी आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3132चे गव्हर्नर रो सुधीर लातुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल याप्रसंगी रोटरीचे डिस्ट्रिक्ट लर्निंग फ़ेसीलेटर रो ओम मोतीपवळे रोटरी माजी गव्हर्नर रो हरीश मोटवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
बीड शहराच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणमान्य व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो यापूर्वी हा पुरस्कार अभिनेते मकरंद अनासपुरे
स्व केशरबाई क्षीरसागर वे शा स धुंडीराज महाराज पाटांगणकर श्रीहरी तुंगार रामप्रसादजी राठी स्व स्व मोतिरामजी वरपे डॉ श्रीहरी लहाने सुभाषचंद्र सारडा श्री शिवाजीराव पंडित संपादक स्व नामदेव क्षीरसागर आदी मान्यवरांना देण्यात आला आहे
या पुरस्कार सोहळ्यास शहरातील सर्वच सामाजिक आणि सेवाभावी संस्थेतील सदस्यांनी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन
प्रोजेक्त चेअरमन सीए सुरेश लड्डा रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर सचिव सुमित जैस्वाल यांनी केले आहे

