माजलगाव — जुन्या मोंढ्यातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दोन किराणा दुकानाची शटर तोडून सामानाची नासधूस केली. गल्ल्यात असलेली 95 हजाराची रोकड देखील लंपास केली.
रहदारीच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जुन्या मोंढ्यातील दिलीप बबन आप्पा खुरपे यांच्या मालकीचे चंद्रशेखर किराणा स्टोअर्स तसेच लक्ष्मीकांत रामहरी झुंजुर्के यांचे लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी ही दोन किराणा दुकान शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून सामानाची नासधूस केली. दरम्यान रविवारी सकाळी दिलीप खुरपे यांना फोनवरून याची माहिती मिळाली. त्यावेळी चोरांनी नासधूस केलेली तसेच गल्ल्यातील 80 हजार पाचशे रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबरोबरच चोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीसीआर देखील चोरून नेला. झिंजुर्के यांच्या दुकानातील कल्याण बारा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी पीडित व्यापाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

